1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

कच्चे तेल 80 डॉलरवर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरूच असून, मंदी ओसरण्याच्या शक्यतेने तेल 80 डॉलर प्रती बॅरलवर गेले आहे.

अमेरिकी बाजारात कच्चे तेल 80.18 डॉलर प्रती बॅरल तर लंडन बाजारात ब्रेंट 79.57 डॉलर प्रती बॅरल इतके होते. तेलाचे दर 100 डॉलरवर गेले तरच ओपेक देश तेलाचे उत्पादन वाढवणार असल्याचे ओपेकने स्पष्ट केले आहे.

ओपेकमधील काही राष्ट्रांना तेलाचे उत्पादन वाढवावेत का नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे ओपेकचे अध्यक्ष जोस बोतेलो यांनी जाहीर केल्याने तेलाच्या दरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.