1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भाषा|

कापसाची निर्यात घसरली

कापसाची निर्यात घसरली
चालू आर्थिक वर्षात कापसाची निर्यात 55 टक्क्यांनी घसरली आहे. भारतीय बाजारात चांगली किंमत मिळाल्याने उद्योजक आणि शेतकऱ्यांनी निर्यात कमी केल्याने ही घसरण झाल्याचे बोलले जात आहे.

2008-09 मध्ये 38 लाख गाठींच्या कापसाची निर्यात करण्यात आली. मागील वर्षात भारताने 85 लाख गाठी कापूस निर्यात केला होता.

कापूस सल्लागार मंडळाने वर्तवलेल्या अंदाज्यानुसार चालू वर्षात 75 लाख गाठींची निर्यात होण्याची शक्यता वर्तवली गेली होती.