गूगलचे ''हिंदी'' प्रेम
मायक्रोसॉफ्टने याहूशी सूत जुळवल्यानंतर आता गूगलने आपल्या संकेतस्थळाकडे भारतीयांना आकर्षित करण्यासाठी 'हिंदी' विषयक स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली आहे. हिंदीचे साहित्य आणि संदर्भ वाढवण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीचे भारतातील उत्पादन संचालक संजय जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार इंटरनेटवर हिंदी आणि अन्य भाषेतील साहित्याचा अभाव आहे. हिंदीचे वाचक अधिक असल्याने, त्यांना सर्च करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. 13 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकेल.