जमशेदपुरमध्ये बोनसचा पाऊस
टाटा उद्योग समूहाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जमशेदपुरमध्ये जवळपास हजारावर कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांवर बोनसची उधळण केली आहे. मागील काही दिवसांपासून या भागातील कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकर कपात केल्याने असुरक्षिततेची भावना कर्मचाऱ्यांमध्ये वाढली होती.
टाटा मोटर्सनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयापाठोपाठ शहरातील अनेक इतर कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. चालू महिन्या येथील कंपन्यांनी जवळपास 200 कोटीचा बोनस वाटला आहे.
टाटा स्टीलने आपल्या 16500 कर्मचाऱ्यांना 81 कोटीचा बोनस वाटला आहे. कंपनीने आपल्या अवजड उद्योगांतील 6500 कर्मचाऱ्यांना 15.27 टक्क्यांचा बोनस दिला आहे. यासाठी कंपनीने 15 कोटीचा खर्च केला.
टेल्कॉन, टीआरएफ, टायो, टिस्को ग्रोथ शॉप, या कंपन्यांनी जवळपास 10 ते 15 कोटीचा खर्च केवळ बोनससाठी केला आहे.