जेट पायलटांचा संप आजही सुरूच
जेट एअरवेज व्यवस्थापन आणि पायलटांदरम्यान सुरू असलेली चर्चा फिसकटल्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशीही जेटचे पायलट सुटीवरच असल्याने आजही जेटच्या प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळी जेटची 11 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, आता सरकार या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. जेटने आपल्या दोन पायलटांना कामावरून काढून टाकल्यानंतर हा वाद निर्माण झाला. या दोघांना कामावर घेण्यात यावे अशी मागणी पायलट संघटनेने केली आहे. तर जेटच्या पायलटांनी अचानक पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलनानंतर व्यवस्थापनाने आणखी पाच जणांना कामावरून काढून टाकल्याने वाद आणखी चिघळला आहे. जेटचे चेअरमन नरेश गोयल यांनी पायलटांना दहशतवाद्यांची उपमा दिल्याने पायलट संघटना चिडल्या आहेत. आजही जेटचे पायलट संपावर आहेत.