1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

टोयोटा उत्पादन वाढवणार

टोयोटा मोटर कॉर्पोरेशनने आगामी मार्च महिन्यापर्यंत आपल्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, कंपनी आपले उत्पादन तीन टक्क्यांनी वाढवणार आहे. कंपनी या काळात 67 लाख कार उत्पादित करणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जपानामध्येही कंपनीने उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला असून, कंपनी 2009-10 पर्यंत 64 लाख गाड्या विकणार आहे.

सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचा मोठा फायदा कंपनीला झाला असून, मंदीचा प्रभाव कमी झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

1937 नंतर प्रथमच चालू वर्षातील मंदीने कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने कंपनी आर्थिक संकटात सापडली होती.