1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

रेल्वे करणार टाटांना मदत

रेल्वे करणार टाटांना मदत
देशातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी टाटा स्टील आपल्या जमशेदपूर येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता आगामी दोन वर्षात एक कोटी टन करणार आहे. कंपनीपुढे इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलाद कसे भारतीय बाजारात न्यायचे असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच रेल्वेने याची तयारीही पूर्ण केली असून, रेल्वे टाटांचे पोलाद वाहून नेण्यास तयार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

टाटांच्या जमशेदपूर येथील प्रकल्पातून 70 लाख टन पोलाद उत्पादन केले जाते. आगामी दोन वर्षात ही क्षमता एक कोटी टनापर्यंत नेण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

भारतीय रेल्वे इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलाद वाहून नेण्यास सक्षम असून, कंपनीने दिलेला माल भारतभर पोहचवण्यासाठी रेल्वे तयार असल्याचे मत टाटानगर स्टेशनचे क्षेत्रीय प्रबंधक सत्यम प्रसाद यांनी दिली आहे.

गम्हरिया भागातील बिरराजपुर येथे नवीन रेल्वे सायडिंग सुरू करण्यात आली असून, या माध्यमातून टाटांचा माल वाहून नेण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
About Writer
वार्ता