विमान प्रवास महागणार?
देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी एटीएफ दरात पुन्हा वाढ केली आहे. याचा फटका आता विमान प्रवास करणाऱ्या ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. आगामी महिनाभरात देशातील सर्वच विमान कंपन्या आपल्या तिकिट दरात 20 ते 25 टक्क्यांची वाढ करण्याचे संकेत मिळत आहेत.
जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांनीही अशाच प्रकारचे संकेत दिले आहेत. एटीएफ दरात झालेली वाढ आणि ग्राहकांची संख्या रोडावल्याने कंपन्या चांगल्याच संकटात सापडल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जेट चालू महिन्यातच आपले तिकिट दर वाढवण्याची घोषणा करण्याची शक्यता असून, या पाठोपाठ देशातील इतर कंपन्याही पुढील महिन्यात दरवाढ जाहीर करणार असल्याचे समजते.