1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

सोन्याची मागणी घसरली

किंमती वाढल्यानंतर देशात तिसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी 49 टक्क्यांनी घसरली आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिल (डब्ल्यूजीसी) ने याची माहिती दिली आहे.

भारतात 2008 च्या तिसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी वाढली होती, आता सोन्याचे दर गगनाला भिडले असल्याने सोन्याची मागणी घसरली आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी घसरत 111.6 टनावर आली आहे.

संस्थेचे सीईओ अराम शीषमणियम यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात सोन्याचे दर गगनाला भिडल्याने मागणी घसरली असल्याने आयातीवरही परिणाम झाला आहे.