होंडा उत्पादन वाढविणार
होंडा मोटरसायकल व स्कूटर इंडिया लिमिटेडने आपल्या मॉडेलमध्ये बदल करून उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे 200 कोटी रूपयांची गुंतवणूक केली असून प्रतिवर्ष 50 लाख वाहणांची निर्मिती करणार असल्याचे होंडा कंपनीचे अध्यक्ष शिंजी आयोमा यांनी सांगितले.
