संबंधित माहिती
- 'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला
- तो सीन संपला, पण....अभिनेत्री प्रिया बापटने कठीण काळात सहन कराव्या लागलेल्या अडचणींबद्दल खुलासा केला
- इम्रान हाश्मी अशोक खरातची भूमिका साकारणार? नाशिकच्या भोंदू बाबावर बनत असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा
- दिपाली सय्यदला फोनवरून धमक्या; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
- सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला
मराठी रंगभूमीवरच्या 'बाई' काळाच्या पडद्याआड; अभिनेत्री विजया मेहता यांचे निधन
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ मराठी रंगकर्मी, दिग्दर्शक आणि अभिनेत्री विजया मेहता म्हणजेच विजयाबाई यांचे ३० जून २०२६ रोजी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अद्वितीय दिग्दर्शनाने व अभिनयाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मराठी नाट्यविश्वात त्यांना अत्यंत आदराने आणि प्रेमाने 'विजयाबाई' म्हणून संबोधले जायचे. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचा एक सुवर्णकाळ संपला आहे.
तसेच त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी गुजरात राज्यातील बडोदा शहरात झाला. त्यांनी प्रायोगिक मराठी रंगभूमीला आकार देण्यात मोलाचे योगदान दिले. साठच्या दशकतात त्यांनी नाटककार विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत ऐतिहासिक 'रंगायन' या प्रायोगिक नाट्यगटाची स्थापना केली. या चळवळीने मराठी रंगभूमीला नवे विचार आणि जागतिक ओळख मिळवून दिली. तसेच आशय आणि नाट्यमांडणीचे अर्थगर्भ प्रायोगिक प्रयोग करणे ही विजयाबाईंची मुख्य खासीयत मानली जात असे. विजयाबाईंच्या कडक शिस्तीत आणि मार्गदर्शनाखाली नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी आणि अशोक सराफ यांसारखे भारतीय अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार घडले आहे.
विजयाबाईंच्या जाण्याने मराठी रंगभूमी आणि समांतर चित्रपटसृष्टीतील ही मोठी हानी आहे. अनेक कलाकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
Edited By- Dhanashri Naik