आरोग्यासाठी उत्तम 'तांबे'
'
तांबे' हा धातु बहुगुणी असून आपल्या आरोग्यासाठीही ते उत्तम असल्याचा उल्लेख भारतीय आयुर्वेदात आला आहे. तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ते सकाळी अंशीपोटी घेतल्याने अनेक प्रकारचे आजार नाहिसे होत असतात. प्राचीन काळी चांगले आरोग्य लाभावे म्हणून तांबाचा वापर केला जात होता. आजही ते महत्त्व कायम आहे. त्यावर विज्ञानानेही शिक्कामोर्तंब केला आहे. बर्मिघम येथील एका हॉस्पिटलमध्ये एक संशोधन करण्यात आले. वैज्ञानिकांनी हॉस्पिटलमधील पारंपरिक शौचालयातील सीट, नळाचे हॅन्डल व दरवाच्या कड्या या तांब्याच्या लावल्या होत्या.इतर धातुंच्या तुलनेत तांब्याच्या वस्तुंवर विषाणूंची संख्या 90 ते 100 टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले. आपण आपल्या रोजच्या जीवनात स्टील, लोखंड अशा धातुच्या नेहमी संपर्कात येत असून त्यामुळे आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात विषाणू प्रवेश करीत असतात. आपण फायबरच्याही संपर्कात येत असतो. त्यावर ही मोठ्या प्रमाणात विषाणू जमतात. हे विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करून आपली रोग प्रतिकारक शक्तीवर हल्ला चढवितात. त्यामुळे आपण नेहमी आजारी पडत असतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे. खबरदारीचा उपाय म्हणून तांब्याच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.