''रेड वाईन'' प्या, दात शाबूत ठेवा!
'
रेड वाईन' हृदयविकार तसेच कॅन्सरवर उत्तम औषधी आहे, असे आतापर्यंत झालेल्या संशोधकांनी सिध्द केले होते. मात्र आता एक पाऊल पुढे टाकत 'रेड वाईन' ही आपल्या मोत्यासारखे दातांचेही रक्षण करीत असते. असा दावा इटली येथील शास्त्रज्ञांनी केला आहे. '
रेड वाईन'मध्ये असलेल्या केमिकलमध्ये दातांना हानिकारक असलेल्या बॅक्टीरिया रोखून ठेवण्याची ताकद असते. दातांचा सगळ्यात मोठा शत्रु स्ट्रेप्टोकोकस म्यूटेंस बॅक्टीरिया हा साखर खाल्याने दातांवर आक्रमन करीत असतो. त्याने दातांसह हिरड्या खराब होतात. पेविया विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात 'रेड वाईन'मुळे हा बॅक्टीरिया नष्ट होत असतो. केवळ अल्कोहोलने बॅक्टीरिया मरत नाही. रेडवाईनमध्ये असलेल्या अल्कोहोलसह इतर तत्त्व त्याला नष्ट करण्यास कारणीभूत ठरत असतात.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा