सिगरेट/ विडी सोडल्यावर वीस मिनिटानंतर वाढलेले हृदयाचे ठोके कमी होतात. तीन तासानंतर वाढलेला रक्तदाब कमी होतो. बारा तासानंतर रक्तातला कार्बन डाय ऑक्साईड सामान्य पातळीवर येतो. चोवीस तासानंतर रक्तातल्या इतर विषारी वायूंपासून सुटका होते. सात दिवसानंतर फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते.