1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा

वा! शाबास बिरबल!

ShreyaWD
एकदा राजवाड्यावरून दरबारात येतानाच बादशहाने मनाशी पक्के ठरवले की, काहीही करून आज बिरबलालरा दरबारात असा प्रश्न करायचा की़, बिरबलाची दातखिळीच बसावी. याप्रमाणे दरबारात येऊन महत्वाची काही कामे झाल्यानंतर बादशहा बिरबलाला म्हणाला,

''बिरबल, पाण्याची मदत न घेता रेती आणि साखर यांच्या मिश्रणातून साखर कशी वेगळी काढता येईल?''

वर बिरबल म्हणाला, ''असे, मिश्रण जमिनीवर पसरून ठेवायचे. काही वेळाने तेथे मुंग्या येतील आणि फक्त साखर घेऊन जातील.''

तेव्हा बादशाहा म्हणाला, ''वा! शाबास बिरबल, तू खरोखरच मलीचा आहे.''
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा