love poem, marathi kavita | मराठी कविता : एक दिवस असंच..
- अमोल कपोले
डोळ्यांनी चांदणं खुडतांना
हळूच हाती लागला
तुझ्या पापणीआडचा चंद्र
तुझ्या पापणीआडचा चंद्र
मनात मलाच शोधतांना
हलकेच सापडत गेल्या
तुझ्या असण्याच्या खाणाखुणा
हलकेच सापडत गेल्या
तुझ्या असण्याच्या खाणाखुणा
पाकळीवरचा दवबिंदू वेचतांना
अलगद अंगी बिलगला
तुझा चिंबलाजरा स्पर्श
अलगद अंगी बिलगला
तुझा चिंबलाजरा स्पर्श
दाटलेले भाव कळताना
अलवार कुजबुजलेले
तुझे गुलाबगोड शब्द
अलवार कुजबुजलेले
तुझे गुलाबगोड शब्द
आणि
सरतेशेवटी तुझ्या नजरेत
नेमका समजलेला
माझ्या हरवलेपणाचा
ओळखीचा अर्थ !
सरतेशेवटी तुझ्या नजरेत
नेमका समजलेला
माझ्या हरवलेपणाचा
ओळखीचा अर्थ !
