गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By

मराठी भाषेचा गौरव जागतिक रीत्या जपण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
- भाषा सारथी, मालव भूषण आणि मालव गौरव पुरस्काराने विविध मराठी विभूती सन्मानित
- विविध सत्र, चर्चा, अभिवाचन, संगीत व सांस्कृतिक गौरव प्रस्तुतिने नटलेले समृद्ध संमेलन
 
दिनांक 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर 2023 ला इंदूरच्या लोकमान्य नगर निवासी मंडळाद्वारे प्रथम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे केले गेले. अनेकानेक सत्र, पुरस्कार, अभिवाचन सत्र, सांगीतिक प्रस्तुती, चर्चासत्र, कवि संमेलन, गायन प्रस्तुती सारख्या विविधरंगी छटा आणि धार्मिक व आध्यात्मिक आढ़ावा घेणारे व्याख्यान या संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले.
 
दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी उद्घाटन समारंभ झाला. डॉ. आशुतोश रारावीकर, संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इन्डिया, डॉ. सुनील कुलकर्णी, निदेशक, केन्द्रीय हिंदी निदेशालय, विवेक घळसासी या समारंभात विशेष अतिथी आणि अध्यक्ष होते . त्याच सोबत सर्वश्री जयंत भिसे, मिलिन्द महाजन, वैभव ठाकुर, नंदू कुलकर्णी, अपर्णा भागवत, अजय वैषंपायन व विवेक कापरे सुद्धा मंचासीन होते.
 
पलाशी शर्मा, परितोष कुलकर्णी आणि जतिन निखाड़े यांच्या सरस्वती वंदना प्रस्तुतीने संमेलन सुरु झाले. त्याच बरोबर कुमारी सौम्या पराडकर ने लोकमान्य टिळकांवर भाष्य प्रस्तुत केले. संमेलन अध्यक्ष वैभव ठाकुर यांनी स्वागत उद्बोधन दिले आणि वसुधा गाडगीळ यांनी संमेलन उद्दिष्ट प्रस्तुत केले. याच सत्रात संमेलनाची स्मरणिका ’लोकमान्य सृजनिका’ चे विमोचन करण्यात आले.
 
यापुढ़े या सत्रात संमेलनाचे प्रमुख पुरस्कार देण्यात आले. यात भाषा सारथी पुरस्कार श्री विवेक घळसासी, श्री आशुतोष रारावीकर, श्री प्रफुल्ल पाठक, श्री सुनील कुलकर्णी, श्री ललित अधाने यांना त्याच बरोबर माळव्यातील जन्म व शिक्षण घेऊन बाहेरच्या जगात आपल्या अफाट कामगिरीने नांव करणारी व्यक्ति अर्थात श्री महेश तागड़े, मुंबई यांना मालव गौरव पुरस्कार देण्यात आला. त्याच बरोबर मालव भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले, श्री विश्वनाथ शिरढ़ोणकर, श्री अरविंद जवलेकर, श्री अश्विन खरे, अलकनंदा साने, विवेक हिरदे, ऊषा वैशंपायन आणि जयंत भिसे.
 
30 सप्टेंबर जागतिक अनुवाद दिवस असल्यानिमित्ताने या संमेलनात शॉपिज़न डॉट इन या कन्टेन्ट पोर्टल कडून साहित्यिक व व्यावसायिक अनुवाद क्षेत्रात योगदानासाठी डॉ. वसुधा गाडगीळ आणि अंतरा करवड़े यांना ’अहिल्या भाषा सेतु सन्मान’ याने विभूषित केले.
 
या सत्रात संबोधन देत असतांना श्री आशुतोष रारावीकर यांनी संमेलन परंपरा, अर्थशास्त्र आणि मराठी साहित्यावर आपले विचार मांडले. श्री सुनील कुलकर्णी यांनी भारतीय भौगोलिक स्थिति आणि मराठी भाषेचा प्रचार प्रसार, विविध बोली आणि काव्य परंपरेबद्दल उद्बोधन दिले. त्याच बरोबर श्री मिलिंद महाजन यांनी बृहन्महाराष्ट्रातील गतिविधी आणि श्री जयंत भिसे यांनी महराष्ट्राबाहेर असले संमेलन करण्यासाठी शुभेच्छा देणारे भाव व्यक्त केले. प्रसिद्ध निरुपणकार , चिंतक विवेक घळसासी यांनी दैनंदिन जीवनातील संस्कार आणि भाषेविषयी निरुपण केले. या सत्राचे संचालन केले डॉ. वसुधा गाडगिळ व अंतरा करवड़े यांनी आणि आभार प्रदर्शन केले अजय वैषंपायन यांनी.
 
यापुढ़ील सत्र होते मराठी अभिवाचन सत्र. यात श्रुतिका कळमकर आणि तन्वी अकोलेकर यांनी परीकथा, आलेख, दीर्घ कथा उत्तम ध्वनि अभिनयाच्या माध्यमाने सादर केल्या. सुरेख संयोजन आणि अभ्यासामुळे असलेले सामंजस्य दोन्ही कलाकारांच्या प्रस्तुतिमध्ये ठळकपणे आढ़ळले. या सत्रात मुख्य अतिथी म्हणून दिल्लीच्या क्षमापाठक आणि गुड़गांव येथील अनघा जोगळेकर होत्या. सत्राचे संचालन केले वीणा जोग यांनी. खुशी कन्नौदकर हिने विशिष्ट वाचन प्रस्तुती दिली आणि तिचाही सन्मान करण्यात आला.
 
यापुढ़ील सत्रात वैजयन्ती दाते आणि आभा निवसरकर यांनी सृजन रंग भाग एक या स्वरुपात कवी संमेलनाचे सूत्र हाती घेतले. मोठ्या प्रमाणात रचनाकारांनी यात सहभाग घेतला यात प्रमुख होते भावना मोंढे, दिलीप श्योपुरकर, पद्मा डोंगरे, राधिका इंगळे, उमेश थोरात, रवीकांत खांडेकर, कविता पुणतांबेकर, निशा देशपांडे, प्रतिमा शिधये, माधुरी खर्डेनवीस, अनिरुद्ध किरकिरे. यासत्राचे अध्यक्षपद भूषविले भोपाळच्या वरिष्ठ कवयित्री सुषमा ठाकुर यांनी.
 
पुढ़च्या सत्रात मालव प्रदेश आणि विजय नगरी साम्राज्य या विषयावर सांस्कृतिक संपदा दर्शनाचा आगळावेगळा कार्यक्रम डॉ. अस्मिता हवालदार यांनी सादर केला. आपण समृद्ध अशा विजयनगर साम्राज्यातील बारकावे आणि विस्मृतीत गेलेल्या इतिहासाच्या माध्यमाने सांस्कृतिक संपदा दर्शन घड़वले. आपल्या धाराप्रवाह प्रस्तुतिला श्रोत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या सत्रातील प्रमुख अतिथी होते शुभा देशपाण्डे आणि अरुणिमा राज़ुरकर व या सत्राचे संचालन केले प्रीती कापरे यांनी.
 
यापुढ़ील सत्रात मालव गौरव पुरस्काराचे मानकरी श्री महेश तागड़े यांची जाहीर मुलाकात घेण्यात आली. श्री अनुराग तागड़े यांनी माळव्यातील शिक्षणापासून तर मुंबईच्या मालिका निर्देशन व निर्मितिसंबंधी प्रवासापर्यन्त विविध प्रश्न या दरम्यान विचारले. दृश्य श्रव्य माध्यमाने काही लोकप्रिय मालिकांसंबंधी विशिष्ट आठवणी आणि माहिती श्रोत्यांना दिली गेली. या सत्राचे संचालन केले शुभा देशपाण्डे यांनी. 
पहिल्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात वैशाली बकोरे यांचे सुगम संगीत गायन रंगले. आपण विविधरंगी कार्यक्रम प्रस्तुत करत त्यात भक्ती, श्रृंगार, भावनाप्रधान सुरेख गीतांचे सुरेल सादरीकरण केले. आपल्या सोबत विश्वेश शिधोरे, सोपान बकोरे, हर्षद शेगांवकर यांनी संगती केली. या सत्राचे संचालन वृषाली ठाकुर यांनी केले.
 
1 ऑक्टोबर 2023 रोजी संमेलनाच्या पुढ़ील दिवशी, पहिले सत्र हे "जागतिक पातळीवर मराठी भाषा आणि तंत्रज्ञान कौशल्य" या विषयावर एक परिचर्चा स्वरुप होते. यात सहभागी असणारे वरिष्ठ मराठी प्राध्यापक ज्ञानेश्वर तिखे यांनी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान त्याच सोबत तरुण मंडळीला वाचन संस्कृतिचा धडा कसा द्यावा यावर उद्बोधन दिले.
 
डॉ. वसुधा गाडगीळ यांनी मराठी भाषा आणि अनुवाद संबंधी विविध आव्हान आणि सृजनात्मक प्रकारांचे सोदाहरण वर्णन केले. आपण रंजक प्रकारे भाषेचा विन्यास आणि भाषांतराचे सौन्दर्य यासंबंधी माहिती दिली. काव्य, कथा आणि विविध विधांमधून अनुवादाबद्दल उत्तम माहिती आपण आपल्या उद्बोधनात दिली.
 
अंतरा करवड़े यांनी स्थानीयकरण आणि वॉईस ओव्हर यासंबंधी जागतिक पातळीवर सुरु असलेल्या व्यावसायिक आणि साहित्यिक भाषा गरजांबद्दल माहिती दिली. आजीविका ते भाषिक अनुशासन आणि उच्चारणापासून उत्पादन प्रभाव सोबत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची गरज असल्याचे आपण म्हटले.
 
या सत्राच्या अध्यक्षपदी असलेले प्रफुल्ल पाठक यांनी तांत्रिक क्षेत्रात यथा सौर ऊर्जा आणि वीज निर्मितीसंबंधी क्षेत्रातील साहित्य आणि त्यासंबंधी जनसामान्याची भाषा याबद्दल नावीन्यविविध तथ्यांसकट माहिती दिली. आपण भाषा, संमेलन, महाराष्ट्राबाहेरील मराठी आणि त्या समोर असलेले आव्हान यासंबंधी विविध उदाहरण देत आपले रोचक उद्बोधन दिले.
या सत्राचे संचालन केले स्मिता महापुरुष यांनी. संमेलनाच्या या दिवशीचे पुढ़ील सत्र होते प्रसिद्ध निरुपणकार, चिंतक विवेक घळसासी. आपण सामान्य जीवन आणि त्यात आध्यात्माची सांगड़ घालत सरळ स्वरुपात कसे सार्थक जगावे त्याच बरोबर संत परंपरा आणि मराठी भाषा या विषयावर आपल्या खुमासदार शैलीत व्याख्यान दिले. या सत्राचे संचालन ममता दीक्षित यांनी केले. या सत्रात श्री दीपक शिराळकर यांच्या पुस्तकाचे विमोचन संपन्न झाले. तसेच या सत्रात शाश्वत मुळे यांनी तेजस्वी भाष्य हे संत परंपरा या विषयावर केले.
 
सृजन रंग भाग दोन, हे संमेलनातील शेवटचे सत्र होते. डॉ. मनीष खरगोणकर यांच्या संचालनात व डॉ. ललित अधाने, औरंगाबाद व विश्वनाथ शिरढ़ोणकर यांच्या मुख्य आतिथ्यात हे सत्र रंगले. या सत्रात अर्चना पंडित, अमित कुलकर्णी, मृणालिनी काळी, कल्पना चौधरी, वैशाली फड़के, आभा निवसरकर, वैजयंती दाते, सुरेश कुलकर्णी, सुरेखा सिसोदिया, ज्ञानेश्वर तिखे यांनी विविध काव्य व लघुकथा रचना सादर केल्या.
 
संमेलनाचे शेवटचे सत्र अर्थातच एक विशिष्ट विषयावर आधारित होते. ’संमेलन परंपरा आणि भाषा समृद्धि’ या विषयावर बोलत असतांना विशिष्ट अतिथी निर्मोही फड़के यांनी विविध भौगोलिक भागातील भाषा, बोली आणि त्यासंबंधी होत असणारे प्रयत्न आणि आव्हान यांच्यावर प्रकाश टाकला.
 
संमेलनाच्या या सत्रात विशेष उपस्थित श्रीकांत तारे यांनी संमेलन परंपरा, त्यात होत असलेले बदल, महाराष्ट्रातील आणि बाहेरच्या क्षेत्रात असलेले सत्रांसंबंधी अव्हान आणि सद्यस्थिति याबद्दल सांगितले.
सत्रात विशिष्ट अतिथी कमळाकर देशपाण्डे यांनी विविध सत्रांच्या माध्यमाने भाषा संमेलनाच्या निमित्ताने होत असलेल्या भाषा समृद्धी आणि वैचारिक देवाण घेवाण याबद्दल मत व्यक्त केले. आपल्या प्रमाणे असे संमेलन हे फक्त ज्ञान वृद्धिचे साधन नसून यामुळे भाषेला सांस्कृतिक दिव्यता प्राप्त होते. या सत्राचे संचालन वैजयन्ती दाते यांनी केले.
संमेलनात विविध कार्यकारिणींचे सदस्य उपस्थित होते यथा ममता घारपुरे, स्रीकांत कुलकर्णी, मंजूषा काणे, प्रकाश वैद्य, गिरीश सरवटे, अनिल चिटणीस, रमेश कर्णिक.  
 
अनेक संस्थांचे प्रतिनिधी यांनी स्वागत व स्मृती चिन्ह देण्यास सहभाग केला ज्यात प्रामुख्याने जयंत सांबरे, संजीव करंबेळकर, अनिल चितांबरे, विद्या नांदेड़कर, सुहास चंदवासकर, प्रतिभा ॠषी उपस्थित होते. 
त्याच बरोबर प्राजक्ता पराडकर, अनिरुद्ध धामारीकर, वैशाली सोलापुरकर यांनी सुद्धा विशेष सहाय्य केले.
 
संमेलनात विविध शहरातून रचनाकार, विचारक आणि चिन्तक उपस्थित होते. संमेलनाचे आभार प्रदर्शन केले संमेलन संयोजिका डॉ. वसुधा गाडगीळ यांनी.
 
- अंतरा करवड़े