गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By

मराठी भाषा गौरव दिन कविता व लघुकथा विधेद्वारे साजरा

इंदूर- दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी मंगल भवन, लोकमान्य नगर येथे लोकमान्य नगर निवासी मंडळ, उत्कर्ष सेवा समिती, ज्येष्ठ नागरिक संस्था तर्फे कवी कुसुमाग्रज  जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला गेला. मराठी भाषा दिन अर्थातच त्या भाषेचा दिवस जी अप्रत्यक्षरीत्या आपल्या जीवनात आकार ग्रहण करते. ती आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग असते. आपण कुठल्या ना कुठल्या रूपात विचारांचा अभिव्यक्तीचा माध्यम म्हणून, संवादाचा माध्यम म्हणून अधिकाराने ती वापरतो.
 
आपली मातृभाषा काहीही प्रयत्न न करता आपल्याला फुलवते जगाशी जोडते. आपल्या भाषेचा गौरव म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेला मानाचा मुजरा दिला गेला.
 
सर्वप्रथम श्री गणपती आणि सरस्वती देवीचे वंदन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय चितळे, प्रमुख पाहुणे श्री अश्विन खरे संपादक श्री सर्वोत्तम मासिक, श्री अरविंद जावळेकर वरिष्ठ साहित्यकार आणि सौ अंतरा करवडे लेखिका व अनुवादक असे होते. सौ. सुहास चंद्वासकर यांनी स्वागत भाषण व अतिथी  परिचय दिले. पाहुणे आणि कविवृंदांचे स्वागत लोकमान्य शिक्षा समिती चे डॉ. विवेक कापरे, श्री बंडू वैशंपायन, श्री नांदेडकर, सौ सोनल जोशी, सौ. प्रीती कापरे, सौ विद्या नांदेडकर आणि इतर मंडळींनी केले. त्या नंतर सौ. उषाताई वैशंपायन आणि श्री विश्वनाथ शिरढोणकर यांचे नवीन पुस्तक प्रकाशन प्रकाशासाठी सन्मान केला गेला त्याच प्रकारे लोकमान्य नगर निवासी मंडळ तर्फे कर्तृत्ववान अध्यक्ष श्री वैभव ठाकूर यांचा ही सन्मान केला.
कार्यक्रमाच्या पहिल्या अंकात वृहद कवी संमेलन आणि दुसऱ्या अंकात लघुकथा अभिवाचन झाले. कवी संमेलनात वृषाली ठाकूर, वैजयंती दाते, वैशाली पिंगळे, सुषमा अवधूत, अलका टोके, ज्ञानेश्वर तिखे, विश्वनाथ शिरढोणकर, सुभेदार साहेब, अरुणाताई खरगोनकर, मंजुषा पांडे, अर्चना पंडित, मनीष खरगोनकर यांनी वेगवेगळ्या विषयावर दर्जेदार काव्य पाठ केले. कवी संमेलनाचे यशस्वी सूत्रसंचालन डॉक्टर मनीष खरगोनकर यांनी केले.
 
मराठी भाषेत लघुकथा विधाची ओळख करून त्या विधेला मराठी भाषेत लोकप्रिय करण्याचे यश मध्यप्रदेशातील इंदूर शहरालाच आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या अंकात भाषेवर केंद्रित लघुकथा वाचन अंतरा करवडे आणि डॉ. वसुधा गाडगीळ यांनी भाषेवर केंद्रित लघुकथांचे वाचन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अश्विन खरे यांनी आपल्या भाषणाने शुभेच्छा दिल्या आणि अध्यक्ष श्री विजय चितळे यांनी मराठी गझल सादर केली. आभार प्रदर्शन सुहास चंद्वासकर यांनी केले.