शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By
Last Updated : सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (16:04 IST)

मराठी राजभाषा दिन : काय काय वर्णू तव गुण, अशी ही माझी गुणवंत मराठी

Marathi Rajbhasha Din
राजभाषा तू असशी माझी मराठी,
संपन्न वाङमय तुझे, समृद्ध मराठी,
साहित्याचे कित्ती दालन उघडे,ज्ञानाचे भांडार मराठी,
अटकेपार झेंडा जीचा तीच आहे मराठी,
गोडवा जिच्यात भरपूर, अशी रसाळ मराठी,
थोर साहित्यिक, विचारवंतांची खाण मराठी,
शब्दसंपत्ती ठासून भरली, अशी वैभवशाली मराठी,
नम्रतेने सतत वागते, तीच आहे शालीन मराठी,
जोश जिच्या नसानसांत धावतो, अशी तडफदार मराठी,
काय काय वर्णू तव गुण, अशी ही माझी गुणवंत मराठी,
अभिमान जीचा बाळगावा, अशी ही माझी माय मराठी!!
...अश्विनी थत्ते.