1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वार्ता|

मारुतीला तगडा नफा

मारुतीला तगडा नफा
आर्थिक मंदीचा प्रभाव कमी होत असल्याने ऑटो उद्योग पुन्हा एकदा भरारी घेत असून, मारुती सुझुकीला चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत तगडा नफा झाला आहे. या कालावधीत कंपनीच्या नफ्यात 92.48 टक्क्यांची वाढ झाल्याने नफा 570 कोटीवर गेला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षातील याच कालावधीत कंपनीचा नफा 296.12 कोटी होता. चालू वर्षात कंपनीच्या उत्पन्नातही वाढ झाली असून, ते 43.67 टक्क्यांनी वाढत 7312.62 कोटीवर गेले आहे.