शेअर बाजारात 291 अंशांची वाढ
युरोपीय बाजारात निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणामुळे आज मुंबई शेअर बाजारात 291 अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय बाजाराचा निफ्टीही 87 अंशांनी वधारला.
बाजार सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच बीएसई 64 अंशांच्या वाढीसह 15462 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 20 अंशांच्या वाढीसह 4613 अंशांवर पोहचले.
ऑटो, कॅपिटल, गुडस, आणि मेटल क्षेत्रात चांगली खरेदी दिसून आली, तर एल एंण्ड टी, महिंद्रा, रॅनबॅक्सी, मारुती सुझुकी, यूनीटेक, स्टरलाइट, या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. टाटा मोटर्स, गेल, सुजलॉन, टीसीएस, भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला.