1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
  4. चॉकलेटी अक्रोड कुकीज

चॉकलेटी अक्रोड कुकीज

साहित्य : 1 कप मैदा, 1/2 कप पीठी साखर, 1/2 कप क्रीम, 1 चमचा लोणी, 1/2 लहान चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा बारीक चॉकलेट, 1 चमचा किसमिस, लाल हिरवी केक पिल्स (गोळ्या), बारीक कतरलेले आक्रोड.

कृती : सर्वप्रथम मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळणीने चाळून घ्यावे. क्रीम, साखर आणि लोणी घालून चांगले फेटून घ्यावे. ह्या मिश्रणात मैदा ‍व बेकिंग पावडर व इतर साहित्य घालून चांगले एकजीव करावे. 1/2 तासासाठी मिश्रणाला फ्रीजमध्ये ठेवावे. नंतर त्याला पोळीसारखे जाडसर लाटून घ्यावे व गोल कुकीज तयार करावे. माइक्रोवेवमध्ये 180 डिग्री सेंटीग्रेडवर 15 मिनिट बेक करावे. थंड झाल्यावर चॉकलेटी कुकीज सर्व्ह करावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा