संबंधित माहिती
- Saffron Rose Biryani Recipe अतिशय शाही, सुगंधी आणि चवदार केशर गुलाब बिर्याणी
- पावसाळ्यात हटके आणि चविष्ट सामोस्यांचे प्रकार नक्की ट्राय करा
- भजी-चहापेक्षा काहीतरी वेगळं! पावसाळ्यात ट्राय करा 'हे' ५ गरमागरम आणि हेल्दी सूप्स
- चवीला एकदम चटकदार आणि बनवायला अगदी सोपी; फायबरने भरपूर असलेली 'मसाला ओट्स खिचडी'!
- पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे सुरक्षित आहे का? त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या
लहान-मोठ्यांना आवडणारी रेसिपी; अतिशय चवदार चीज, कॉर्न आणि पनीर बर्गर
चीज, कॉर्न आणि पनीर बर्गर ही एक अतिशय चवदार आणि लहान-मोठ्यांना आवडणारी रेसिपी आहे. घरच्या घरी हॉटेलसारखा बर्गर कसा बनवायचा, याची सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत.
साहित्य-
टिक टिक्कीसाठी
पनीर: १ कप (किसलेले किंवा मॅश केलेले)
मका (स्वीट कॉर्न): आधा कप (उकडलेले आणि हलके जाडसर वाटलेले)
बटाटा: २ मध्यम (उकडलेले आणि मॅश केलेले - बाइंडिंगसाठी)
आले-लसूण पेस्ट: १ छोटा चमचा
हिरवी मिरची पेस्ट: १ छोटा चमचा (आवडीनुसार)
चाट मसाला: १ छोटा चमचा
गरम मसाला: आधा छोटा चमचा
कोथिंबीर: बारीक चिरलेली
ब्रेड क्रम्ब्स : ४-५ चमचे (कुरकुरीतपणासाठी)
कॉर्न फ्लोअर : २ चमचे (स्लरीसाठी)
मीठ: चवीनुसार
तेल
बर्गर असेंबल करण्यासाठी:
बर्गर बन्स: २ ते ३
चीज स्लाईस किंवा किसलेले चीज
बर्गर मेयॉनीज / टोमॅटो केचप
कांदा आणि टोमॅटो: गोल कापलेले (स्लाईस)
बटर
ALSO READ: नाश्त्यात बनवा पनीर कॉर्न सँडविच
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात मॅश केलेला बटाटा, किसलेले पनीर आणि उकडलेले कॉर्न एकत्र करा. त्यात आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, चाट मसाला, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला. मिश्रणाला चांगला आकार येण्यासाठी त्यात २-३ चमचे ब्रेड क्रम्ब्स टाका आणि सर्व मिश्रण नीट मळून घ्या. आता या मिश्रणाचे गोल आणि थोडे जाड गोळे करून बर्गर बनच्या आकाराच्या टिक्क्या तयार करा.
आता एका लहान वाटीत २ चमचे कॉर्न फ्लोअर आणि थोडे पाणी टाकून पातळ पेस्ट (स्लरी) बनवा. तयार केलेली पनीर-कॉर्न टिक्की आधी या कॉर्न फ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवा आणि नंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये चांगली घोळवून घ्या यामुळे टिक्की मस्त कुरकुरीत होते. पॅनमध्ये थोडे तेल गरम करून या टिक्क्या दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्या. बर्गर बन मधोमध कापून घ्या. तव्यावर थोडे बटर लावून बन्स आतल्या बाजूने हलके शेकून घ्या. बनच्या खालच्या भागावर बर्गर मेयॉनीज किंवा टोमॅटो केचप लावा. त्यावर कांदा आणि टोमॅटोचे स्लाईस ठेवा. त्यावर आपण बनवलेली गरमागरम पनीर-कॉर्न टिक्की ठेवा. टिक्की गरम असतानाच त्यावर एक चीज स्लाईस (किंवा भरपूर किसलेले चीज) ठेवा, जेणेकरून ते हलके वितळेल. बनच्या वरच्या भागालाही थोडे मेयॉनीज लावून बर्गर बंद करा. चला तर अप्रतिम, चीजने भरलेला चीज, कॉर्न आणि पनीर बर्गर तयार आहे! हा बर्गर तुम्ही फ्रेंच फ्राईज आणि टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
