संबंधित माहिती
- घरातील 'या' ३ ठिकाणी औषधे ठेवण्याची चूक करू नका; आजार आणि वैद्यकीय खर्चही अफाट वाढेल!
- Vastu Shastra: वास्तुच्या या १० नियमांमुळे घराचे वातावरण बदलू शकते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहील
- Lucky Plants : तुमच्या बाल्कनीत या ५ वनस्पती लावा, प्रगतीचे बंद दरवाजे उघडतील
- कधीच भासणार नाही पैशांची चणचण, तिजोरी नेहमी राहील भरलेली!
- घरात झुरळ दिसणे अशुभ का मानले जाते? ज्योतिष आणि वास्तु संकेता बद्दल जाणून घ्या
चपाती हातात देण्याची चूक तर करत नाही ना? वास्तुनुसार होऊ शकते आर्थिक नुकसान
वास्तु शास्त्रानुसार घराचे स्वयंपाकघर (किचन) हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यापासून ते ते वाढण्यापर्यंत अनेक नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत. अनेकदा आपण नकळत काही अशा चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. अशीच एक मोठी चूक म्हणजे एखाद्याच्या हातात थेट चपाती किंवा भाकरी देणे.
वास्तुशास्त्रानुसार असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते.
आपल्या हिंदू संस्कृतीत पहिली चपाती गाईला आणि शेवटची चपाती कुत्र्याला देण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. परंतु घरातील सदस्यांना किंवा पाहुण्यांना जेवण वाढताना आपण चपाती थेट त्यांच्या हातात देतो का? जर तुम्ही असे करत असाल, तर वेळीच सावध व्हा. वास्तुशास्त्रानुसार, चपाती नेहमी ताटात ठेवूनच वाढली पाहिजे. जाणून घेऊया यामागचे कारण आणि होणारे नुकसान. हातात चपाती देणे का मानले जाते अशुभ?
१. दारिद्र्य आणि गरिबीला आमंत्रण
वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या हातात थेट चपाती देता, तेव्हा घरची बरकत (लक्ष्मी) निघून जाते. असे केल्याने अन्नपूर्णा माता आणि धनलक्ष्मी देवी नाराज होतात, ज्यामुळे घरात पैशांची चणचण भासू लागते आणि गरिबी पाय पसरू लागते.
२. पुण्य कर्मांचा नाश होतो
शास्त्रात असे मानले गेले आहे की, हातात ठेवून दिलेली चपाती ही 'भिक्षे'सारखी (भीकेसारखी) मानली जाते. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा पाहुण्यांना अशी चपाती दिली, तर त्यांना जेऊ घालण्याचे पुण्य नष्ट होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
३. नात्यांमध्ये दुरावा येतो
हातात चपाती दिल्यामुळे देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीमध्ये वैचारिक मतभेद वाढू लागतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण भांडणे आणि तणावाचे वातावरण निर्माण होते.
जेवण वाढण्याची योग्य पद्धत कोणती?
जर तुम्हाला घरात सुख, समृद्धी आणि शांतता टिकवून ठेवायची असेल, तर जेवण वाढताना खालील गोष्टींची विशेष काळजी घ्या:
ताट किंवा प्लेटचा वापर करा: कोणालाही चपाती द्यायची असेल, तर ती नेहमी प्लेट, ताट किंवा पोळीच्या डब्यात ठेवूनच आदराने वाढावी.
आदराने जेवण वाढा: जेवण नेहमी शांतपणे आणि आदराने वाढले पाहिजे. घाईघाईत किंवा चिडून अन्न वाढल्यास अन्नाचा अपमान होतो.
विशेष वास्तु टिप :
स्वयंपाकघरात जेवताना कधीही एकाच ताटात तीन चपात्या एकत्र वाढू नयेत. तीन ही संख्या अशुभ मानली जाते. जर कोणाला तीन चपात्या द्यायच्याच असतील, तर आधी दोन द्याव्यात आणि नंतर एक वाढावी किंवा चपातीची घडी घालून ती ताटात ठेवावी.
