- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - शाकाहारी
उडदाच्या डाळीचे वडे
साहित्य : उडदाची डाळ, कांदा, लसूण, तिखट, मीठ, जिरे, कढीलिंब, सुके खोबरे, तेल.कृती : उडदाची डाळ आठ तास आधी भिजत घालावी. नंतर ती बारीक वाटून घ्यावी. नंतर वाटलेल्या डाळीच्या प्रमाणात व चवीप्रमाणे बारीक चिरलेला कांदा, लसूण, खोबरे (किसून), तिखट, मीठ, जिरे व कढीलिंब बारीक चिरून सर्व सामग्री घालावी व भज्यांकरिता करतो, त्याप्रमाणे सैलसर पीठ करून, वडे तळून काढावे. हे वडे लोणच्याबरोबर चांगले लागतात.