1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

कोथिंबिरीच्या वड्या

कोथिंबीर
साहित्य : कोथिंबीर, आले, लसूण, हिरव्या मिरच्या, डाळीचे पीठ (बेसन), मीठ, तेल 

कृती : सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. एक वाटी डाळीचे पीठ घ्या. त्यात वाटलेले आले लसूण आणि मिरची घाला. साधारण भज्यांच्या पिठाइतपत पातळ करा. त्यात चवीपुरते मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घाला. आता थोड्या खोलगट थाळ्या किंवा धातूच्या डब्यांची झाकणे घ्या. त्याला तेलाचा हात फिरवून घ्या. आता पळीने वरील मिश्रण एका थाळ्यात दोन पळ्या एवढे घाला. या थाळ्या कुकरमध्ये ठेवून (एकावर एक ठेवायच्या असल्यास दोन थाळ्यांच्यामध्ये ताटली ठेवू शकता. अन्यथा एकेक थाळी पण ठेवू शकता.) शिटी न लावता १० मिनिटे वाफ येऊ द्या. नंतर गॅस बंद करून ५ मिनिटे ठेवा. मग कुकर उघडून थाळ्या बाहेर काढा. थोडे थंड झाल्यावर सुरीने वड्या कापून काढून घ्या.