साहित्य : पुदिन्याची एक गड्डी, ओल्या मिरच्या, लसूण, मीठ, लिंबू, साखर. कृती: पुदिना निवडून घ्यावा. नंतर पुदिन्याचा पाळा, लसणीचा अंदाचे दहा-बारा पाकळ्या, सहा - सात मिरच्या व चवीप्रमाणे मीठ व साखर असे जिन्नस एकत्र करून बारीक वाटावे. वर लिंबू पिळावे. ही चटणी फार रुचकर लागते. पाच-सहा दिवस टिकते.