बटाट्याची भेळ
|
1 कप बटाट्याचे काप, 1 कप पनीर, 1 कप बटाट्याचा कीस, दीड कप मोड आलेले मूग, दीड कप डाळिंबाचे दाणे, दीड कप शेव, 1 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, 1 शिमला मिरची लांबट कापून, 1 मोठा चमचा भाजलेली पांढरी तीळ, एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे, 1 चमचा कॅर्नफ्लोर.
करावयाची कृती:
बटाट्याचे चौकोनात कापलेले तुकडे व्यवस्थित तळून घ्या. पनीर तळून घ्या. किसात कॉर्न फ्लोर मिळवून तळून घ्या.
शिमला मिरची, थोडे दही टाकून दोन मिनिटे भाजून घ्या. एका बाऊलमध्ये सर्व साहित्य मिक्स करा. चाट मसाला टाका. लाल टमाट्याची चटणी आणि चिंचेची चटणी टाका. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
