शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

व्हेज कोल्हापुरी

साहित्य: 1 गाजर, 1 बटाटा, 1 शिमला मिरची, 1 कप कॉलीफ्लॉवर, 3 टोमॅटो, 1 कांदा, अर्धा कप हिरवे मटार, ½ इंच आल्याचा तुकडा, 4 लसूण पाकळ्या, लाल तिखट, हळद, तेल, लवंग पावडर, बडीशेप पावडर, वेलची पावडर, कोल्हापुरी मसाला, धणे पूड, दालचिनी पावडर, मीठ.
कृती: कढईत तेल गरम करून आलं-लसूण परता. कांदा घालून ब्राऊन होयपर्यंत परता. लाल तिखट, टोमॅटो, मीठ घाला. गार होऊ द्या. मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. कढईत तेल गरम करून हळद, लाल तिखट घालून बटाट्याचे तुकडे घाला. शिजू द्या. कांदा-टोमॅटोची प्युरी घाला. पाणी घाला. उकळी येऊ द्या. सर्व मसाले आणि मीठ घाला. सर्व भाज्या घाला. शिजू द्या. तयार भाजीवर वरून तेलाची झणझणीत फोडणी ओता. सर्व्ह करा.