साबुदाण्याची खिचडी
|
कृती - साबुदाणा 1 तास अगोदर धुऊन ठेवावा. नंतर तुपाची फोडणी करून त्यात जीरे, बटाट्याच्या फोडी व मिरच्या टाकाव्यात व झाकण ठेवून वाफ आणावी.
पाच मिनिटानंतर धुतलेल्या साबुदाण्यात दाण्याचा कूट, मीठ व साखर मिसळून फोडणीत टाकावे व वाफ आणावी. साबूदाणा शिजला की खाली उतरावे.
