बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जुलै 2023 (12:08 IST)

वेगवान आलिशान कारने गर्दीवर धडक दिल्याने 9 जणांचा मृत्यू; 13 जखमी

Ahmedabad Road Accident अहमदाबादमधील उड्डाणपुलावर गुरुवारी एका वेगवान आलिशान कारने गर्दीवर धडक दिल्याने नऊ जण ठार तर 13 जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली.
 
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सरखेज-गांधीनगर महामार्गावरील इस्कॉन पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास 100 किमी प्रतितास वेगाने जात असलेली कार दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातानंतर तेथे जमलेल्या गर्दीवर धडकली.
 
मृतांमध्ये बोताड आणि सुरेंद्रनगर येथील तरुणांचा समावेश असल्याचे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
त्याचबरोबर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, अहमदाबादमधील इस्कॉन ब्रिजवर काल रात्री घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. मी मनापासून शोक व्यक्त करतो. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली आहे.
 
या प्रकरणाबाबत, अहमदाबादच्या डीसीपी ट्रॅफिक नीताबेन हरगोवनभाई देसाई यांनी सांगितले की, काल रात्री झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आणि 10-11 जण जखमी झाले. कार चालक रुग्णालयात असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही त्याला अटक करू. या प्रकरणातील सर्व मृतांना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू.