1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. iqbal-kaskar-reaction-on-bhendi-bazar-building-collapse

भेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतांची संख्या 15 वर

मुंबईतील जे जे मार्ग परिसरात सहा मजली इमारत कोसळल्याच्या घटनेत आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर 14 जण जखमी झाले आहेत. 

विशेष म्हणजे आत्तापर्यंत 21 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि फायर ब्रिगडेच्या जवानांना यश आले. या संपूर्ण अपघाताची सरकारने गंभीर दखल घेतल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत म्हणून पाच लाख रूपयांची मदत केली जाणार आहे. यामध्ये तीन लाख रूपये मुख्यमंत्री निधीतून दिले जाणार आहेत तर दोन लाख रूपये मुख्यमंत्री विशेष निधीतून दिले जाणार आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसंच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांचा वैद्यकीय खर्च  सरकार करणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी होणार असून म्हाडाच्या उपमुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली समिती गठन केली जाणार आहे आणि त्या समितीमार्फत चौकशी केली जाणार आहे.

पुढील लेख
स्वच्छ भारत’, ‘बेटी बचाओ’ आणि ‘नोटाबंदी’ पाठ्यपुस्तकांमध्ये