1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Landslides due to heavy rain in North Sikkim

उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ३ लष्करी जवानांसह ३७ जणांचा मृत्यू

assam flood
उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. येथे मुसळधार पावसामुळे रस्ते कोसळले आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहात रस्ते वाहून गेले आहे. गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. ईशान्येकडील राज्यांमध्ये पूर आणि पावसामुळे कहर होत आहे. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे लोक त्रस्त आहे.  
लष्करी छावणीत भूस्खलन झाले आहे
ईशान्येकडील मान्सून आपत्तीमुळे आतापर्यंत ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तीस्ता नदीला पूर आला आहे. अनेक भागांशी संपर्क तुटला आहे. सिक्कीममधील एका लष्करी छावणीतही भूस्खलन झाले. या दुर्घटनेत तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाला, तर ६ सैनिक अजूनही बेपत्ता आहे. अशी माहिती समोर आली आहे.

Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
LIVE: महाराष्ट्रात कोरोनाचे ४९४ सक्रिय रुग्ण