अण्णांना पुन्हा धमकी
राळेगणसिध्दी : ज्येष्ठ समाजसवक अण्णा हजारे यांना पुन्हा धमकीचे पत्र आले असून त्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हजारे यांच्या राळेगण येथील कार्यालयाला गुरुवारी मिळालेले हे पत्र हिंदी भाषेत असून धमकी विशेष म्हणजे या पत्रावर महादेव पांचाळ याने स्वत:चे छायाचित्रही दिले आहे. या पत्रावर लातूर जिल्ह्यातील दिंडेगावचा पत्ता आहे. या पत्रात म्हटले आहे की, ‘मी शार्पशूटर आहे. तुमची सुपारी घेतली आहे,’ या आशयाची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. याबाबत पारनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.