1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. अण्णांनी सुरक्षा नाकारली

अण्णांनी सुरक्षा नाकारली

अण्णा हजारे
राळेगणसिध्दी : सातत्याने येत असलेल्या धकमीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सरकारकडून देण्यात येणारी झेड दजार्ची सुरक्षा त्यांनी नाकारली आहे. राज्यात दुष्काळी स्थिती असताना एका व्यक्तीवर सुरक्षेचा खर्च कशासाठी, असा सवाल करुन ‘समाज हितासाठी गोळ्याही झेलायला तयार आहे’ असे अण्णा हजारे म्हणाले.
 
हजारे यांना पुन्हा धमकीचे पत्र आल्यानंतर त्यांच्या सहकारर्यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गेल्या दोन महिन्यात अण्णांना जीवे मारण्याच्या चार ते पाच वेळा धमक्या आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळीच राज्य सरकारने अण्णांना झेड सुरक्षेबरोबरच त्यांचे कार्यालय व निवासस्थानी आणखी विशेष पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला. अण्णांना त्याची माहिती समजल्यावर त्यांनी सुरक्षा न घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही.