1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. खुशखबरी! आता ATM मधून निघेल 50 रुपयाची नोट

खुशखबरी! आता ATM मधून निघेल 50 रुपयाची नोट

atm machine
एटीएमचा वापर करणार्‍यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कधी आपल्याला गरज नसली तरी एटिएममधून मोठे नोट काढणे भाग पडत. पण येणार्‍या काही दिवसांमध्ये आता इतर बँकांच्या एटिएममधून लोकांना 500 व 100 रुपयांसोबत 50 रुपयांची नोट देखील मिळू शकेल. त्या सोबत आता बँक लोकांना नाणे देण्यासाठी देखील नाही म्हणू शकणार नाही.  
 
बँकांच्या एटीएममध्ये फक्त 500 रुपयांची नोट असल्यामुळे ग्राहकांना बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागते. गरज नसली तरी त्यांना जास्त पैशे काढावे लागतात. म्हणून त्यांचा अडचणींना लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना आदेश दिले आहे की एटीएममध्ये आता दोन प्रकारच्या नोटा ठेवणे गरजेचे राहील.   
 
आरबीआयने आदेश दिले आहे की जर एटिएममध्ये 500 रुपयांची नोट ठेवू शकतो तर त्यात 100 रुपयांची नोटा देखील असायला पाहिजे. याच प्रकारे 100 रुपयांच्या नोटा असतील तर त्यात 50 रुपयांच्या नोटा देखील असायला पाहिजे. आरबीआयच्या या आदेशानंतर काही बँकांनी आपल्या एटीएममध्ये 50 रुपयांचा नोटा ठेवणे सुरू केले आहे.     
 
या अगोदर ऑगस्ट 2013च्या आदेशानुसार आरबीआयने बँकांकडून 100-500शिवाय 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा देखील एटिएममध्ये टाकण्यास सांगितले होते पण अधिकतर बँकांनी असे केले नाही. याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की आता लोकांना जेवढ्या पैशांची गरज आहे तेवढेच ते काढू शकतात.  
 
सध्या 50 रुपयांच्या नोटांची सुविधा रायपूर स्थित एसबीआयच्या एटिएममध्ये सुरू झाली आहे. बँकिंग अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की येणार्‍या काळात इतर बँकांमध्ये देखील ही सुविधा सुरू होईल.