1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. गोंधळातच वाहून गेले पावसाळी अधिवेशन

गोंधळातच वाहून गेले पावसाळी अधिवेशन

वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) आणि ललित मोदी प्रकरणावरुन सुषमा स्वराज यांच्यावर विरोधकांनी केलेला हल्लाबोल या पार्श्वभूमीवर कोणत्याही महत्वाच्या निर्णयाविना पावसाळी अधिवेशन वाहून गेले. दरम्यान, विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण देशभरातून टीकेचा सूर उमटतो आहे.

ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी गदारोळ घातला. गोंधळ घालणार्‍या   काँग्रेसच्या ४४ पैकी २५ सदस्यांना पाच दिवस निलंबित करण्यात आले. तरीही या मुद्यावरुन पुन्हा गोंधळात भर पडली.

काँग्रेस सदस्यांनी दोन्ही सभागृहात ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यावरून परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेत कुठलेही कामकाज झाले नाही. लोकसभेत मात्र विरोधी पक्षांच्या अनुपस्थितीत प्रश्नोत्तराचा तास व इतर काही काम झाले.