तर पाकिस्तानचे तुकडे, तुकडे...
यापूर्वीच्या युध्दांचा अनुभव लक्षात घेऊन पाकिस्तानने धडा घ्यावा. कारण भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युध्द झाल्यास पाकिस्तानचे तुकडे, तुकडे होतील, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पाकिस्तानला डिवचले आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी युध्दाबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, पाकिस्तान घाबरले असल्याने अशा प्रकारचे वक्तव्य केली जात आहेत. कोणी वायफळ बोलत असेल तर खुशाल बोलू द्या. वेळ आल्यावर आपण दाखवून देऊ.
पाकिस्तानने सुरुवातीस आपल्या देशातील पोखरलेल्या किडीकडे लक्ष द्यावे. दहशतवाद, गरिबीकडे पहावे, असा उपरोधिक सल्लाही सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.