सोमनाथ भारती यांना अटक
घरगुती हिंसाचार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका असलेले आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. मागील आठवडाभरापासून विविध कारणे देत भारती स्वत:ची अटक टाळण्याचा प्रयत्न करत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज भारती यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. भारती यांच्या पत्नी लिपिका मित्रा यांनी त्यांच्याविरोधात द्वारका पूर्व पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली होती. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.