संबंधित माहिती
- अखेर पालकमंन्त्र्याची यादी जाहीर; देवेंद्र फडणवीस 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री
- Lumpy Skin Disease : सावधान! लम्पी त्वचा रोगाचं महाराष्ट्रात थैमान,लंपीग्रस्त जनावरांसाठी विलगीकरण केंद्र करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली
- Dahi Handi 2022: दहीहंडीत जखमी गोविंदांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार
- गोविंदांना क्रीडा कोट्यातून आरक्षणाची घोषणा, निर्णयाविरुद्ध MPSC परिक्षार्थी आक्रमक
- कट प्रॅक्टिसविरोधात राज्य सरकार आणणार कायदा
महाराष्ट्रात 30 हजार शिक्षकांची भरती करणार, एकनाथ शिंदेंची घोषणा
राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे. त्याशिवाय जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. ते शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलत होते.
"राज्यात शिक्षकांची 30 हजार पदे शासन भरत असून लवकरच पदभरती केली जाईल. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील शिक्षण विभाग काम करत आहे.
हा प्रश्न टप्पाटप्प्याने सोडवता येईल का याचा देखील विचार सुरू असून त्यासाठी लागणारा वेळ शिक्षकांनी शासनाला द्यावा," असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
Published By -Smita Joshi
Published By -Smita Joshi
