संबंधित माहिती
- Jalgaon Train Accident मृतांची संख्या 13 वर पोहोचली, 8 मृतदेहांची ओळख पटली
- पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी? जळगाव दुर्घटनेवर खरगे यांनी केली मागणी
- रेल्वे सुरक्षा आयुक्त जळगाव रेल्वे अपघाताची चौकशी करतील, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतांसाठी दुःख व्यक्त केले
- LIVE: नागपुरात कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक
- लज्जास्पद : उल्हासनगरमध्ये 5 वर्षांच्या लहान मुलीवर पिता-पुत्र कडून लैंगिक अत्याचार, काही तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जळगाव रेल्वे अपघातात 4 परदेशी नागरिकांचाही मृत्यू, ते या देशाचे नागरिक होते
Jalgaon train accident news: महाराष्ट्रातील जळगाव येथे लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 4 लोक इतर देशांचे नागरिक असल्याचे आढळून आले आहे.
महाराष्ट्रातील जळगाव येथे बुधवारी एक भीषण रेल्वे अपघात झाला. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवांनंतर, अनेक प्रवाशांनी रेल्वेतून रुळांवर उड्या मारल्या आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना चिरडले. या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जखमींवर उपचार सुरू आहे. त्याचवेळी, आता अशी माहिती समोर आली आहे की या रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 13 जणांपैकी 4 जण नेपाळचे नागरिक आहे.अपघाताच्या एका दिवसानंतर गुरुवारी, अधिकाऱ्यांनी माहिती दिली की जळगाव रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 13 जणांपैकी चार जण नेपाळचे नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृतांमध्ये एक मुलगा आणि दोन महिलांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत 13 पैकी आठ मृतदेहांची ओळख पटली आहे. यापैकी दोन मृतांची ओळख त्यांच्या आधार कार्डवरून पटली आहे. जळगाव जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांपैकी चार जण नेपाळचे होते.
Edited By- Dhanashri Naik
