शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जानेवारी 2025 (21:32 IST)

हिवाळी कार्निव्हलमध्ये 19 वर्षीय मुलाची हत्या, काचेच्या बाटलीने गळा चिरला

murder
Himachal Pradesh News: मनालीमध्ये सध्या हिवाळी कार्निव्हल सुरू आहे. बुधवारी रात्री कार्निव्हल दरम्यान मनू रंगशाळेत एक कार्यक्रम सुरू होता आणि स्टेजच्या मागे एका 19 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. वादानंतर आरोपीने मृताच्या मानेवर तुटलेल्या काचेच्या बाटलीने वार केला.
मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशातील मनाली येथे हिवाळी कार्निव्हल दरम्यान एका 19 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

बुधवारी रात्री मनु रंगशाळेत शेकडो लोक एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत असताना स्टेजच्या मागे ही घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

Edited By- Dhanashri Naik