शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (10:25 IST)

उना जिल्ह्यात कुटुंबाची गाडी नदीत वाहून गेली, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

himachal rain
हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे एक भीषण घटना घडली आहे. एक कार नदीत वाहून गेली असून, त्यामध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांसह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमधील होशियारपूर पासून 34 किमी अंतरावर असलेल्या जज्जो येथे रविवारी हा अपघात झाला आहे. पाण्याने भरलेल्या पावसाळी नदीत एक कार वाहून गेली. कार वाहून गेल्याने एकाच कुटुंबातील आठ जणांसह नऊ जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण बेपत्ता आहे.
 
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलच्या चालकासह कुटुंबातील 11 सदस्य हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील मेहतपूरजवळील डेहरा येथून पंजाबच्या एसबीएस नगर जिल्ह्यातील मेहरोवाल गावात एका लग्न समारंभासाठी जात होते. त्यावेळी ही घटना घडली
 
पोलिसांनी सूचना मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले, पण मुसळधार पाऊस आणि नदीत पूर आल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच प्रशासनाने पीडित कुटुंबियांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.