1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. A Singaporean oil barge docked at Palshet

सिंगापूरचे तेलवाहू बार्ज पालशेत किनारी

Guhagar
गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी जयगड समुद्रात पलटी झालेले सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने आले आहे.

सिंगापूर येथून तेल घेऊन आलेले बार्ज रविवारी दिनांक 17 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील 13 नॉटीकल मैल खोल समुद्रात आले असता सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास पलटी झाले. त्यामुळे बार्ज मधील तेल व इतर वस्तू समुद्रात वाहून गेल्या आहेत. या बार्जवरील कर्माचारी सुखरूप आहेत.दरम्यान, किनाऱ्यावरील नागरिकांनी वाहून किनारी आलेल्या वस्तूंना हात लावू नये. तसेच काही संशयित वस्तू दिसून आल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील लेख
सत्तेची भांग पिणारे उद्या ‘मातोश्री’वर कब्जा करतील- संजय राऊत