शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (10:41 IST)

हवामान अपडेट्स

गळवार 5 जुलैपासून मुंबईसह राज्यभरात कोसळधारांचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेषत: 4 ते 7 जुलै यादरम्यान संपूर्ण कोकणपट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधारा पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोकादायक पातळी ओलांडली. सध्या पाण्याचा प्रवाह 7.50 मी उंचीवरून वाहत आहे. धोकादायक भागातल्या नागरिकांना स्थलांतर करण्याते आदेश देण्यात आले आहेत. 
कोल्हापूर पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला 
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, राधानगरी, भुदरगड, करवीर, शाहूवाडीत दमदार पाऊस असून भोगावती नदी दुथडी भरून वाहू लगली आहे.