संबंधित माहिती
- गाडी शिकताना ब्रेकऐवजी एक्सलरेटरवर पडला पाय, माय-लेकींनी गमावला जीव
- इंदुरीकर महाराजांसमोर चिमुकल्याचा डान्स
- Weather Update महाराष्ट्रात उष्णतेची लाट, 11 ते 4 बाहेर पडू नका : हवामान विभाग
- मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा गजाआड
- तुम्ही गद्दार आहात ... बच्चू कडूंची गाडी अडवून एका वयोवृद्धाचा शाब्दिक हल्ला
आईनं गळफास घेऊन तर 2 तरुण मुलींनी विहिरीत उडी मारून संपवलं जीवन
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका धक्कादायक घटनेत आईसह दोन तरुण मुलींनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ही घटना मन्याळे गावात घडली आहे. सुनिता अनिल जाधव (वय 48) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर त्यांच्या मुली प्राजक्ता जाधव (वय 22) आणि शितल जाधव (वय 18) या दोन्ही बहिणींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येने परिसर हादरून गेलं आहे. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.
आईने आत्महत्या केल्यानंतर मुलींनी जीवन संपविल्याचा अंदाज बांधला जात आहे तरी तिघींच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
