1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 मार्च 2023 (15:05 IST)

इंदुरीकर महाराजांसमोर चिमुकल्याचा डान्स

jhumka wali por viral
जळगाव- येथे इंदुरीकर महाराजांचे किर्तन आयोजित करण्यात आले असताना झुमका वाली पोर या अहिराणी गाण्यावर एका चिमुकल्याने ठेका धरला. त्याला बघून इंदुरीकर महाराजांनी किर्तन थांबवून मुलाला स्‍टेजवर बोलावले आणि नाचायला लावले. या घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सध्‍या सोशल मिडीयावर व्‍हायरल होत आहे.
 
कीर्तनात पहिल्याच रांगेत बसलेल्या चिमुकल्याला इंदुरीकर महाराजांनी स्टेजवर बोलावलं आणि गाणं म्हणून नाचायला सांगितलं. चिमुकल्याने भर मंचावर बिनधास्‍त ठेका धरला. यावेळी इंदुरीकर महाराजांनी डोक्यावर हात ठेवला तर एकच हशा पिकला.
 
इंदुरीकर महाराजांच्‍या कीर्तनाचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्‍हायरल होत आहे.