शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:11 IST)

आम्ही बांडगुळं नाही आम्ही बाळासाहेबांनी उभा केलेल्या वटवृक्षाच्या पारंब्या आहोत

uddhav thackeray
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच मराठी भाषा दिनानिमित्त केलेल्या भाषणातून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा उल्लेख बांडगुळं असा केला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाचा वृक्ष उभा केला आहे. जे गेले ते बांडगुळं होती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
 
उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही बांडगुळं नाहीत. आम्ही बाळासाहेबांनी उभा केलेल्या वटवृक्षाच्या पारंब्या आहोत. हा वटवृक्ष बाळासाहेबांच्या विचाराने मजबुतीने उभा आहे. त्यांना (उद्धव ठाकरेंना) आम्ही बांडगुळं वाटत असू तर आज या बांडगुळांनी त्यांना शक्ती दाखवून दिली आहे. आज ते कुठे आहेत आणि आम्ही कुठे आहोत, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे,” अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor