संबंधित माहिती
- जीओ युजर्स दुसऱ्या युजर्संना इंटरनेट शेअर करणार
- त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी दोन दिवसापासून संपावर
- विमान प्रवासासाठी धमाकेदार ऑफर
- आता रेल्वेची एका आयडी वरुन १२ तिकिटे काढा
- ट्रायच्या निर्णयाशी सरकार सहमत नाही, केबल ऑपरेटर व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेऊ - केंद्रीय नभोवाणी व माहिती प्रसारण राज्यमंत्री हर्षवर्धन सिंह राठोड
उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट
शीत वारे आणि कमी दाबाचे क्षेत्र या वातावरणातील प्रमुख बदलामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील गारठा कायम असून, मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १६.३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ६.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
पुढील लेख
