बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 9 जानेवारी 2019 (08:43 IST)

विमान प्रवासासाठी धमाकेदार ऑफर

एअर एशिया एअरलाइन्सने एक धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे. आता प्रवाशाला विमानातून प्रवास करण्यासाठी फक्त ९९९ रुपये खर्च करावे लागतील. प्रवाशाला airasia.com आणि  AirAsia अॅपच्या माध्यमातून तिकीट बुक केल्यावरच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ही ऑफर २१ जानेवारी ते ३१ जुलै २०१९ या कालावधीसाठी मर्यादित आहे. राष्ट्रीय विमानप्रवास करण्यासाठी ९९९ रुपये भाडे आकरण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास भाड्याची सुरुवात २ हजार ९९९ रुपयांपासून करण्यात आली आहे. या सेवेतून प्रवाशांना आशियातील देशांमध्ये आणि ऑस्ट्रेलियाला जाता येणार आहे. 
 
राष्ट्रीय विमान प्रवास करण्यासाठी बंगळुरु, नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, कोच्ची, गोवा, जयपूर, चंदीगड, गुवाहाटी, विशाखापट्टणम , हैदराबाद, श्रीनगर, रांची, भुवनेश्वर, इंदूर, चेन्नई या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवाशाला आतंरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल, तर त्यात बॅंकॉक, सिडनी, ऑकलॅन्ड, मेलबर्न, सिंगापूर आणि बाली या ठिकाणांची निवड करु शकतात. एअर एशियाच्या फेस्टिव सेल वेबसाइटनुसार, एअर एशिया इंडिया, एअर एशिया बेरहाद, थाई एअर एशिया आणि एअर एशिया एक्स एअर एशिया ग्रुप नेटवर्कद्वारे चालविल्या जाणाऱ्या सर्व विमानतळावर या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.